नोकरी करताय? मग आर्थिक नियोजनाचे काय? चला सविस्तर पाहूया
नोकरी

नोकरी करताय? मग आर्थिक नियोजनाचे काय? चला सविस्तर पाहूया

Oct 2, 2024

पैसा बोलता है… की पैसा बोलता है… हे गाण आपण एकदा तरी ऐकलं असेल किंवा तुम्ही एकदा तरी तुमच्या गोड आवाजात म्हटलं असेल? बरंच जुनं गाण आहे. पण, त्याचे हे बोल पैशाचे महत्व सांगून जाते, की बाबा पैसा असेल तरच आयुष्यात सर्व ठीक आहे. कारण, पैसा आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कामी येतो. त्यामुळे तुम्हाला फक्त नोकरीच असेल तर तुम्हाला आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. तुमच्या स्वप्नांचे दरवाजे इथूनच उघडणार आहेत.  ते कसं करायचं हे आपण सविस्तर जाणून घेऊया..

नोकरदारांसाठी आर्थिक नियोजन आवश्यक

आर्थिक ध्येय काय आहे?

एखादी गोष्ट घेतोय म्हटल्यावर ती घेण्याआधी आपण काही तरी प्लॅन केलेलं असतं. जसं की, टीव्ही घ्यायचा आहे. का? तर मुलांना काही तासांसाठी कार्टून पाहता येईल तसेच काही शैक्षणिक व्हिडिओही पाहता येईल. उदा. मुलांच्या गरजा आणि अवधीनुसार त्यांना त्याचा वापर करता येणार आहे. इथं सगळ्या गोष्टी टीव्ही घ्यायच्या आधीच फिक्स आहेत. तसेच, आर्थिक नियोजन करताना आपल्याला करावे लागणार आहे. कारण, पैसे भविष्यासाठी जोडून ठेवायचे आहे, हे काही ध्येय नाही आहे. म्हणून त्यासाठी आधी ध्येय ठरवावे लागेल. यामध्ये मग तुम्ही स्वत: चे घर घेणं असेल, मुलाच्या शिक्षणासाठी असेल, सेवानिवृत्ती आणि परदेशी दौरा असेल. अशी काही ध्येय ठेवून तुम्ही आर्थिक नियोजनाचा पाया घालू शकता.

बजेट तयार करणं म्हणजे काय?

नोकरी करणाऱ्यांना आपल्याला मिळणाऱ्या पगारानुसार बजेटिंग करणं म्हणजे  आर्थिक स्थैर्य मिळवण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल होय. यामध्ये तुम्ही दोन पद्धतीने खर्चांना विभागू शकता. पहिली पद्धत आवश्यक गोष्टी ज्या लागणारच आहेत, दुसऱ्यामध्ये विविध खर्चांचा समावेश करु शकता.  यापैकी काही भाग बचत आणि गुंतवणुकीसाठी काढून ठेवावा लागणार आहे.  तसेच,  वेळोवेळी त्यात काळानुसार बदल करणेही आवश्यक ठरते. तरच, तुमचे बजेट भविष्यात तुम्हाला मजबूत सुरक्षा प्रदान करु शकते.

कर्ज असेल तर दूर्लक्ष नको

आर्थिक नियोजनामध्ये कर्जाचे मॅनेजमेंटही येते. त्यामुळे तुम्ही जर कर्ज घेतले असेल तर त्याचे परतफेड करण्याचे धोरण आखणे गरजेचे आहे. हे जर आपण केले नाही तर आपल्याला पुढे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार. त्यामुळे योग्य धोरण ठरवून तुम्ही कर्जाची परतफेड करु शकता. हे देखील भविष्यात तुमची पत निर्माण करायला मदत करणार आहे. त्यामुळे कर्जाकडे दूर्लक्ष करु नका.

बचत आणि गुंतवणूक

जेव्हा आपण नोकरदार म्हणून काम करत असतो तेव्हा बचत आणि गुंतवणूक करणे खूप गरजेचे ठरते. कारण, हे तेच  पर्याय आहेत. जे आपले भविष्य स्थिरस्थावर करु शकतात. म्हणून बजेटिंग करताना एक ठराविक रक्कम बाजूला काढून त्यापैकी काही बचत आणि गुंतवणुकीसाठी तुम्ही वापरु शकता. सध्या मार्केटमध्ये म्युच्युअल फंडाच्या एफडी आणि एसआयपीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यामुळे यात पैसा गुंतवण्याआधी मार्केट रिसर्च किंवा तज्ज्ञांशी सल्लामसलत करुनच गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. काहीही माहिती न काढता गुंतवणूक केल्यास मोठा फटका बसू शकतो. म्हणून माहिती काढून नियमित गुंतवणूक केल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊन, तुम्हाला अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय पूर्ण करायला मदत मिळते.

सेवानिवृत्ती नियोजन आहे गरजेचे

आयुष्यभर कुटुंबीयांसाठी मेहनत केल्यावर सेवानिवृत्ती तरी आनंदात आणि निश्चिंत जावी, यासाठी काम करत असतानाच, सेवानिवृत्तीचे नियोजन करणे फायद्याचे ठरु शकते. म्हणून एक ठराविक निधी सेवानिवृत्तीसाठी सरकारच्या एखाद्या योजनेत आपण टाकू शकतो. तसेच, अन्य ठिकाणी देखील आपण गुंतवणूक करु शकतो. ज्यातून आपल्याला अधिक परतावा मिळू शकेल आणि आपली सेवानिवृत्ती आपल्याला आनंदात कुटुंबीयांसह घालवता येईल.

 

…म्हणून वेळीच आर्थिक नियोजनला आरंभ करा, तरच भविष्य सुखात घालवता येणार आहे…

1 Comment

  • Good to learn about mutual fund

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *