आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास समजून घ्या सोप्या मार्गाने

आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास समजून घ्या सोप्या मार्गाने
Admin | 04 October 2026 | कर्ज | 4 views

रस्ता माहिती असला की चालायला सोपं जाते. हो की नाही ? यात दुमत नाहीच. पण त्याआधी म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला तो माहिती करुन घ्यावा लागतो. तेव्हाच दुसऱ्यांदा त्याहून चालणं सोप्पं जाते. तसे आपण मागील दोन लेखात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्वातंत्र्य याविषयी जाणून घेतलं आहे. त्यामुळे आपल्याला रस्ता माहिती असला तरी त्या रस्त्यावरुन आपल्याला आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास अजून सोपा कसा करता येईल हे आपण आज जाणून घेणार आहोत.

आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून आपल्या हे माहिती झाले आहे की, कमाई केलेला पैसा कसा वापरायचा, कुठे खर्च करायचा आणि कुठे गुंतवायचा. पण, हे करत असतानाच आर्थिक स्वातंत्र्यालाही आपल्याला गवसणी घालयची आहे. यासाठी सर्वात आधी आपल्याला बजेटिंग, सेव्हींग आणि गुंतवणुकीवर भर देणं गरजेचे आहे. तसेच, सेव्हींग आणि गुंतवणुकीसाठी योग्य साधने किंवा पर्याय कोणते आहेत हेही आपल्याला पाहवे लागणार आहे. तरच आपण आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकणार आहोत. चला तर मग सविस्तर समजून घेऊया.

बजेटिंग आवश्यक

आपल्या पगारानुसार किंवा व्यवसायानुसार आपल्याला प्रत्येक महिन्यांचे मासिक बजेट तयार करावे लागणार आहे. यामध्ये मग तुमचा महिन्याला लागणारा किराणा, घरभाडे, बाकी छोटे-मोठे बिल्स, कुठे बाहेर फिरायला जाणं असेल, इमर्जन्सी निधी, सेव्हींग आणि गुंतवणूक असेल याचा संबंध येतो. एकदा बजेट तयार झाल्यावर तुम्ही त्यानुसार तुमची रक्कम वळवू शकता.

सेव्हिंगसाठी काय?

सेव्हींग करताना कोणत्या बॅंक्स चांगले व्याजदर देत आहेत. त्यानुसार तुम्ही सेव्हींग करु शकता. अनेकजण सेव्हींगसाठी आवर्ती ठेव आणि मुदत ठेवमध्ये किंवा पोस्टाच्या एखाद्या योजनेत रक्कम सेव्हींग करायला प्राधान्य देतात. कारण, तातडीच्या वेळी रक्कम सहज तुम्हाला काढता येते. त्यामुळे एखादी इमर्जन्सी आली तर यातून पैसे काढून तुमच्यावरची अडचण भागवू शकता. त्यामुळे कर्ज घेण्यापासून तुम्ही वाचू शकता.  पण, सेव्हींग खात्यावरून मिळणारे  व्याज कमी असते त्यामुळे सध्याच्या वाढत्या महागाईला मात देणे अशक्य आहे. पण, हा पैसा ठेवायचा सुरक्षित आणि विश्वसनीय मार्ग आहे.

गुंतवणूक कुठे कराल?

गुंतवणूक करायचा विचार डोक्यात असेल तर तुम्हाला एक ध्येय ठरवून ती करावी लागणार आहे. तरच तुम्हाला सर्व चित्र स्पष्ट राहणार आहे. समजा तुम्हाला घर घ्यायचे आहे. मग तुम्ही त्यानुसार पैसे  म्यूच्यूअल फंड, शेअर मार्केटमध्ये किंवा अशा मालमत्तेत गुंतवू शकता. ज्याची किंमत तुम्हाला काही वर्षातच मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करणे आवश्यक आहे. याठिकाणी टाकलेला पैसा तुम्ही लगेच काढला तर तुमच्याजवळ मोठी रक्कम कधीच होणार नाही. त्यामुळे दीर्घकालीन उद्दीष्टे ठेवूनच गुंतवणूक करा.  पण, या गोष्टीमध्ये रिस्कही जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी गुंतवणूक करण्याआधी मार्केट रिसर्च आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे.

सातत्य ठेवाच!

आता या वरील गोष्टीत तुम्हाला सातत्य ठेवणं आवश्यक आहे. शिवाय इमर्जन्सी निधी आणि वैदकीय विम्याचा बंदोबस्त आपल्याला करुन ठेवावा लागणार आहे.  या गोष्टी बजेटिंगमध्ये येतातच. पण, तरीदेखली या गोष्टींसाठी सेव्हींग करत असलेल्या किंवा गुंतवणूक करत असलेल्या  पैशांना शक्यतो हात लावणे टाळा. कारण, याच गोष्टी अशा आहेत. ज्या तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गात अडथळा आणू शकतात. म्हणून या गोष्टींच्या तयारीत असणे कधीही चांगले आहे. 

‘हे’ आहेत मोठे अडथळे

 तसेच, तुम्ही एखादे कर्ज घेतले असेल किंवा घेण्याच्या तयारीत असाल तर त्यानुसार तुमच्या बजेटिंगमध्ये तुम्ही बदल करुन घेऊ शकता. कारण ही देखील अशी गोष्ट आहे.  ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याला मुकावे लागू शकते. यामुळे कर्ज असेल तर फेडायच्या दुष्टीने बजेट सेट करा. शिवाय ते घ्यायचे असेल तर तसे नियोजन आधीच करा. म्हणजे त्यानुसार तुम्हाला काही वर्षातच आर्थिक स्वातंत्र्य उपभोगता येऊ शकते. तसेच, ते उपभोगत असताना तुमच्या फ्रेश माईंडमधून आणखी चांगल्या आयडीया आणून आणखी उंच भरारी घेऊ शकता. हे सर्व शक्य आहे ते तुमच्या बजेटिंग आणि सातत्यामुळे. 

अर्थबोधच्या अर्थसाक्षर चळवळीत सामील व्हा..

अर्थबोधने आर्थिक साक्षरतेची चळवळ सुरू केली आहे. जिच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक साक्षर होण्याचे धडे देऊन,  त्यांनाही अर्थशाहीच्या मुख्य प्रवाहात आणता येईल. तसेच,  समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी करता येईल.  मात्र, यासाठी सर्वांनी अर्थबोधच्या अर्थसाक्षर चळवळीत सहभागी होणं गरजेचे आहे. तसेच, हा लेख सर्व गरजूंपर्यंत पोहचवणेही तेवढंच आवश्यक आहे. म्हणून हा लेख शेअर करा आणि खऱ्या अर्थाने अर्थसाक्षर चळवळीत सहभागी व्हा… 

Share: